esakal | परिक्षा रद्द होणार नाही; अफवा पसरवू नका...- सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

परिक्षा रद्द होणार नाही;  अफवा पसरवू नका...- सामंत

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. 6) जाहीर केले. 

परिक्षा रद्द होणार नाही; अफवा पसरवू नका...- सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. 6) जाहीर केले. 

ही बातमी वाचली का? ... तासनतास प्रवास करून त्यांना यावं लागतंय कामावर!

सामंत यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीईटी सेलने पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. या सर्व परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रणासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? फळांच्या राजालाही कोरोनाचा फटका

ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्र्यांना सादर करतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? ... अन्‌ डहाणू तलासरीचे ते एक हजार मच्छीमार माघारी फिरले

मल्टीपर्पज लॅब सुरू करण्याच्या सूचना 
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध आजारांसंदर्भातील चाचण्या घेता येतील, अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी दिल्या. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अशा प्रकारची प्रयोगशाळा सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य विभागाच्या आवश्‍यक परवानग्या तातडीने देण्यात येतील. राज्यातील इतर विद्यापीठांनी अशा प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. 

loading image