esakal | भिवंडीत म्हाडा बांधणार 20 हजार घरे; जितेंद्र आव्हाडांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad

भिवंडीत म्हाडा बांधणार 20 हजार घरे; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचे (common people) घराचे स्वप्न (Dream Home) पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण विभाग राज्यभरात घरे उभारण्याचे (house Construction) नियोजन करत आहे. त्यानुसार म्हाडा (mhada) भिवंडीत 20 हजार घरे उभारणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केली आहे.

हेही वाचा: खासगी केंद्रात कोरोना लसीकरणाला वेग; आठवड्याभरात 55 टक्के हिस्सा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या सोडतीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच गृहनिर्माण मंत्र्यांनी भिवंडीत घरे उभारण्याची घोषणा केली आहे. भिवंडी पालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करेल, अशी माहिती आव्हाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे . ही घरे आर्थिकदृष्ट्या मागास, गरीब, मध्यमवर्गीयांच्या घरांच्या सुविधेसाठी म्हाडाकडून भिवंडीमध्ये घरे बांधण्यात येणार आहेत.

loading image
go to top