उद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये ?

उद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये ?

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रात एकूण ८९ रुग्ण आहेत. अशात देशभरात देखील कोरोनाचा आकडा आता चारशे च्या पलीकडे गेलाय. दरम्यान सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणि देशात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते त्यातील मोठा आकडा हा परदेशातून भारतात कोरोना घेऊन आलेल्यांचा आहे. अशात राजेश टोपे यांनी देखील आज घेतलेल्या पत्रकार आपल्याकडे अजूनही सतेज २ सुरु असल्याचं सांगितलं आहे. अशात उद्या एक महत्त्वाचा निर्णय येणार आहे.    

भारतात करोनाचा संसर्ग तिसऱ्या स्टेजवर म्हणजेच कम्युनिटी स्प्रेडवर, समुदाय स्तरावर व्हायला सुरुवात झाली आहे का? याबाबत उद्या माहिती मिळू शकणार आहे. ICMR चे साथीच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या याबाबत एका गणिती मॉडेलवर काम सुरु असून उद्या म्हणजेच मंगळवारी याबाबत माहिती समोर येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात असणाऱ्या ८९ रुग्णांपैकी ( सोमवारी सकाळी आलेली आकडेवारी ) थेट परदेशात कोरोनाची लागण झालेले आणि त्यानंतर महाराष्ट्रात पॉझिटिव्ह आढळले रुग्ण जास्त आहेत. अशात त्यांच्या अत्यंत जवळचे म्हणजेच घरातील लोकं किंवा ड्रायव्हर यांना कोरोनाचा संसर्ग झालाय झालाय. अशात कम्युनिटीमध्ये म्हणजेच समुदायात कोरोनाची लागण झालीये का ? यावर उद्या काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

ICMR to share information about current stage of corona virus spread 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com