Thane News: केडीएमटीच्या बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार सुरुच, प्रवासी हैराण!
KDMT Bus: मागील काही दिवसांपासून केडीएमटीच्या बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
कल्याण : एनआरसी कॉलनी मार्गावरील बस गुरुवारी (ता. २८) संध्याकाळी रस्त्यात बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मागील काही दिवसांपासून बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे ग्रहण कधी संपणार, असा सवाल प्रवासी करीत होते.