कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत व्यवसाय वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Business

कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत यावर्षी देशातील छोट्या दुकानांमधील विक्री तब्बल १९ टक्क्यांनी वाढली असल्याचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

Business : कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत व्यवसाय वाढला

मुंबई - कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत यावर्षी देशातील छोट्या दुकानांमधील विक्री तब्बल १९ टक्क्यांनी वाढली असल्याचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीत विक्री जास्त झाल्याने दुकानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारतातील विविध भागांची तुलना करावयाची झाल्यास पूर्व भागात ही विक्री २१ टक्के व उत्तर भागात १९ टक्के वाढली. तर पश्चिम आणि दक्षिण भागात याच कालावधीत १८ टक्के विक्री वाढली आहे. या कालावधीत पादत्राणे, चप्पल यांच्या उद्योगात ३० टक्के वाढ झाली. सौंदर्यप्रसाधने, साबण इत्यादींच्या विक्रीत फक्त सात टक्के एवढीच वाढ झाली.

ग्राहक सध्या ऑनलाइन खरेदीही करत आहेत आणि त्याचवेळी त्यांना निवडीसाठी अधिक पर्याय हवे असतील, तर ते दुकानातही येत आहेत, असे असोसिएशनचे सीईओ कुमार राजगोपालन म्हणाले. ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहक केवळ विश्वासाच्या विक्रेत्यांनाच प्राधान्य देतात आता नव्या वर्षातही हाच कल कायम राहणार असून, भारतीय बाजारपेठाजगात सर्वांत चांगली कामगिरी करतील, असा आशावादी त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :CoronavirusMumbaiBusiness