esakal | विधायक घटस्थापना मंदिरातच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विधायक घटस्थापना मंदिरातच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्यातील रावगाव येथील ग्रामस्थांनी वरदायिनी मंदिरात गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशी श्री मारुती शेठ पडवळ संचालित स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रामुळे पंचक्रोशीतील युवकांचा प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. वरदायिनी मंदिरात घटस्थापनेनिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध विषय व स्पर्धा परीक्षेची आणि अवांतर असंख्य पुस्तके मोफत वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील हे पहिलेच अभ्यासिका केंद्र आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाली-सुधागडचे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशी अभ्यासिका सुरू करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: शासकीय कापुस खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : कृषिमंत्री दादा भुसे

यानिमित्त राबगाव गावातील अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्राचे उदघाटन तहसीलदार रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, मारुती पडवळ, मोहन ओसवाल, सुधागड तालुका स्पर्धा परीक्षाप्रमुख प्रा. संतोष भोईर, विनोद भोईर, रावगाव ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल खैरे यांनी केले. तर आभार सागर शिंदे यांनी मानले.

loading image
go to top