
मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. मे यश कॉर्पोरेशनचे रमेश सोलंकी यांनी यशवंत जाधवांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.
मुंबईः मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. मे यश कॉर्पोरेशनचे रमेश सोलंकी यांनी यशवंत जाधवांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. रमेश सोलंकी यांनी या तक्रारीचं पत्र मुंबई पालिका आयुक्त आणि मुंबई पोलिसांना दिलं आहे.
या तक्रारीच्या पत्रात रमेश सोलंकी यांनी मर्जीतल्या कंत्राटदाराला नेमण्यासाठी जाधव हे धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. तसंच कंत्राटदाराला कंत्राट मागे घेण्यासाठी दबाब टाकत असल्याचीही त्यांची तक्रार आहे.
अधिक वाचा- कोरोनाचा परिणाम पुढच्या पिढीवरही; कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक
यासोबतच त्यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि कंत्राटदार यांचं संभाषण आहे.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(बातमी अपडेट होत आहे.)