खारघर, तळोजातील प्रदूषणाची अखेर पालकमंत्र्यांकडे तक्रार 

गजानन चव्हाण
Monday, 12 October 2020

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी आणि रासायिक वायूमुळे तळोजा, कळंबोली, कामोठे, रोडपाली आणि खारघर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार 15 दिवसांपासून सुरू आहे. पहाटेच्या वेळी वायुप्रदूषण वाढते, याबाबत पाटील यांनी अदिती तटकरे यांचे लक्ष वेधले. 

खारघर  : तळोजा परिसरात जल आणि वायुप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची ग्वाही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले. 

हे वाचा : लस आल्याशिवाय महाविद्यालये सुरू करू नयेत

कळंबोली येथील विद्या संकुल सभागृहात शुक्रवारी पनवेल शहर आणि ग्रामीण परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या वेळी पनवेल जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी तटकरे यांची भेट घेऊन तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी आणि रासायिक वायूमुळे तळोजा, कळंबोली, कामोठे, रोडपाली आणि खारघर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार 15 दिवसांपासून सुरू आहे. पहाटेच्या वेळी वायुप्रदूषण वाढते, याबाबत पाटील यांनी अदिती तटकरे यांचे लक्ष वेधले. 

खूशखबर : कोकण मंडळाची घरांसाठी लवकरच सोडत

या वेळी अदिती तटकरे यांनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्याची ग्वाही दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक विजय खानावकर उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint to Guardian Minister about pollution in Kharghar, Taloja