एकमेकांच्या विरोधात  मारहाणीच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मुंबई : वरळी येथे इमारतीच्या लिफ्टमध्ये जास्त माणसे घेतल्याच्या वादातून मारहाण झाल्याच्या तक्रारी दोघांनी एकमेकांच्या विरोधात केल्या आहेत. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक ९० नजीक श्रीराम मिल सोसायटीतील रहिवासी मोहित शुक्‍ला यांच्याकडे घरगुती कार्यक्रम होता. त्या वेळी इमारतीच्या लिफ्टमधून जास्त व्यक्तींनी ये-जा करू नये, असे महेंद्र सारंगकर (वय ५३) यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला मारहाण झाली; त्यावेळी आपल्या हातात बाळ असल्यामुळे प्रतिकार करता आला नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

शुक्‍ला यांनीही आपल्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती २ डिसेंबरला मिळाली. त्यानंतर सारंगकर व शुक्‍ला यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दोघांनी ३ डिसेंबरला एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints of fighting against each other