कल्याणमधील स्कायवॉक पूर्ण करा, पोलीस गस्त वाढवा

रविंद्र खरात 
शनिवार, 7 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण पूर्व मधील रखडलेला स्कायवॉक पूर्ण करा, स्कायवॉक आणि परिसरात सी सी टीव्ही कॅमेरा बसवा आणि बोगदा, स्कायवॉक वर पोलिसांची गस्त घाला, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भारत सोनावणे, सुमेध हुमने, शेखर केदारे यांनी नागरिकांची सह्यांची मोहीम घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. 

कल्याण पूर्व सिद्धार्थ नगर ते कल्याण रेल्वे स्थानक असा स्कायवॉक पूर्ण झाला असून सिद्धार्थ नगर ते गणपती चौक परिसरातील स्कायवॉक काम रखडल्याने कल्याण पूर्व मधील नागरीकांना बोगद्यातून प्रवास करत गणपती चौकाकडे जावे लागते. मंगळवारी रात्री कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात स्टेशन जवळील बोगद्यात विनोद सुर्वे नावच्या प्रवाशाची लुट करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुर्वे यांची हत्या करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना अटक केली. मात्र या घटनेमुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

रखडलेला स्कायवॉक पूर्ण करा, सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे, स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बल मार्फत त्या परिसरात रात्रीच्यावेळी गस्त घालावी या मागणीसाठी भारत सोनावणे, सुमेध हुमणे शेखर केदारे,  या सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (ता. 7) एप्रिल रोजी कल्याण पूर्व मधील रेल्वे बोगद्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले, या उपोषणाला नागरीकांनी पाठिंबा देत सह्यांच्या मोहीमेमध्ये सहभाग घेतला .

Web Title: complete the work of skywalk police round increase