esakal | पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिपची सक्ती; विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिपची सक्ती; विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना

पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण द्यावे लागत असल्याची आरेड उद्योगांकडून होत असते. या विद्यार्थ्यांनाही नोकरीचा अनुभव यावा या उद्देशाने या अभ्यासक्रमांमध्ये इंटर्नशिप सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिपची सक्ती; विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना

sakal_logo
By
तेजस वाघमारे


मुंबई: पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण द्यावे लागत असल्याची आरेड उद्योगांकडून होत असते. या विद्यार्थ्यांनाही नोकरीचा अनुभव यावा या उद्देशाने या अभ्यासक्रमांमध्ये इंटर्नशिप सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनाबाबत अखेर महामंडळाने काढले परिपत्रक

सध्या केवळ इंजिनीअरिंग, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. मात्र बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना इंटरशीपची संधी मिळत नाही. नवीन शिक्षण धोरणात याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. यानुसार विद्यापीठांना अभ्यासक्रमात एक पूर्ण सत्र हे इंटर्नशिपसाठी राखीव ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर याच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करावे अशी सुचनाही केली आहे. तसेच विद्यार्थ्यांयासाठी 20 टक्के क्रेडीट देण्याच्या सुचनाही यात करण्यात आल्या आहेत.

डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे व ते नोकरीस सक्षम व्हावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. यासाठी उद्योागांचे विचारही लक्षात घ्याव्यात असेही मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही इंटर्नशिप कोणत्याही स्थितीत महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये न होता कंपन्यांमध्ये व्हावी अशी सुचनाही यात केली आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनी कपंन्यांशी सामंजस्य करारही करावा अशी सुचनाही यात देण्यात आली आहे. याचे मुल्यमापन करताना कंपनीकडून येणारे मूल्यांकनही विचारात घ्यावे असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )