हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यात घुसलेल्या संगणक परिचालकांवर लाठी हल्ला, विरोधकांकडून संताप व्यक्त

हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यात घुसलेल्या संगणक परिचालकांवर लाठी हल्ला, विरोधकांकडून संताप व्यक्त

मुंबई:  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर बसून आंदोलन केल्यानंतर संगणक परिचारक यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा आझाद मैदानात बसलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

शिवाय या आंदोलनाला बसलेल्या संगणक परिचारिकांना आझाद मैदानातून बाहेर काढून त्यांना ट्रेनमध्ये बसून रवाना करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त आझाद मैदान सीएसटी रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला होता. शिवाय या प्रकरणी सरकारचा निषेध संगणक परिचारक यांनी व्यक्त केला आहे.

यावर आता मनसे आणि भाजप कडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी संताप व्यक्त करत शिवसेनेला टोला लगावला आहे.  संगणक परिचारकांच्या आंदोलनाच्या पदरी ब्लॅकआउट करून लाठीचार्ज करून त्यांना त्या ठिकाणाहून उठवण्याचा प्रयत्न झाला ही शिवशाही नव्हे ही तर मोगलाई आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. शिवाय आंदोलन बाबतची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सध्या सरकार विसरतोय असाही टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

तर भाजप नेते राम कदम यांनीही ट्विट करुन यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सर्व संगणक परिचालक यांना रात्री १० च्या सुमारास महाराष्ट्र सरकारनं लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले. सोब महिला अपंग होते. सुमारे ५ ते ७ हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे. काही समजेना, महाराष्ट्र सरकारनं जुलूम करण्याची सीमा पार केली. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ, असं राम कदम म्हणालेत.

computer teacher enter minister hasan mushrif bungalow lathicharge 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com