esakal | ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम', वाचा पूर्ण बातमी..
sakal

बोलून बातमी शोधा

ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम', वाचा पूर्ण बातमी..

ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम', वाचा पूर्ण बातमी..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कुटुंब नियोजन म्हंटल की सर्वात आधी डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो तो कंडोम वापरण्याचा. फक्त कुटुंब नियोजनच नव्हे तर लैंगिक आरोग्य सुधृढ ठेवण्यातही कंडोम मोठी भूमिका बजावत असतात. कंडोम म्हंटल की काहीतरी अश्लील किंवा टॅबू असंही अनेकांना वाटतं. मात्र याबाबत उघडपणे बोलणं गरजेचं आहे. अनेकदा निकृष्ठ दर्जाच्या कंडोममुळे लैंगिक आजार (STD -  सेक्शुली ट्रान्समिटेड डिसीज) आणि लैंगिक इन्फेक्शन (STI - सेक्शुली ट्रान्समिटेड इन्फेक्शन) होण्याचा मोठा धोका असतो. 

मोठी बातमी पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!

दरम्यान याचसंदर्भात सरकारने आता बोगस कंडोम शोधण्यासाठी धाडी टाकण्यास सुरवात केलीये. या धाडींमध्ये सुमारे १ लाख बनावट कंडोम जप्त करण्यात आले आहेत. या १ लाखांपैकी तब्ब्ल ८७,५०० बोगस कंडोम एकाच छाप्यात पकडण्यात सरकारला यश आलंय. यातील अनेक कंडोम्स हे बनावट आहेत, तर हजारो कंडोम्सची एक्सपायरी डेट उलटून गेली आहे. बनावट कंडोम सोबतच अनेक बोगस वैद्यकीय उपकरणे देखील पकडली गेली आहेत आहे. या उपकरणाची किंमत तब्बल 19.39 कोटींपेक्षा जास्त आहे.  

MHRA च्या पटेल यांनी याबाबत माहिती माध्यमांसोमोर ठेवली आहे.  2018 ते 2019 या वर्षात अवैध कंडोम आणि वैद्यकीय उपकारांची विक्री आणि उत्पादन करणाऱ्या 859 लोकांना अटक करण्यात आली आहे. MHRA ने जप्त केलेले कंडोम अत्यंत धोकादायक आहेत. यांच्या वापरामुळे अनेकप्रकारचे आजार होऊ शकतात. अनेकदा असे कंडोम मोठ्या प्रमाणात बाजारात येतात अशी माहिती MHRA चे अधिकारी पटेल यांनी दिली आहे.  

मोठी बातमी चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

एमएचआरएने (MHRA) जप्त केलेले कंडोम अत्यंत असुरक्षित आहेत. बरेच लोक अशा बनावट कंडोमचा अवैध व्यापार करतात. यामुळे, बर्‍याच वेळा असे कंडोम बाजारात येतात जे सुरक्षेसाठी चांगले नसतात, असे सांगितले. 

दरम्यान या टाकण्यात आलेल्या धाडी यूकेच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) ने 2018 ते 2019 दरम्यान UK मध्ये टाकल्यात. आणि याबाबतची माहिती ब्रॅडफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक महेंद्र पटेल यांनी दिली आहे.

मुंबईसारख्या अति लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये आणि देशभरात याप्रकारची मोहीम राबवली गेली पाहिजे. भारतात कंडोमबद्दल प्रचार प्रसार केला जातो. मात्र अजूनही आपल्या लैंगिक समस्यांवर बोलणं अनेकांना जमत नाही. भारतात असाच कंडोम घोटाळा या आधी समोर आलाय. कंडोम तयार करणाऱ्या 11 कंपन्यांनी सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याचं यामधून समोर आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये दोन सरकारी कंपन्यांचाही समावेश होता. ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (CII) या संदर्भात चौकशी देखील केलेली.

con dom scam is revealed more thane one lac fake con doms seized by MHRA  

loading image