esakal | पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!
sakal

बोलून बातमी शोधा

पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!

सानपाडा सेक्‍टर- 20 जवळील पाम बीचलगतच्या नाल्याजवळ मंगळवारी (ता.11) सकाळी मगरीचे दर्शन झाले. यापूर्वीही जानेवारी महिन्यात या परिसरात मगर आढळल्याचे सांगण्यात येत आहे. 

पाम बीचजवळ पोहून बसली होती; त्याला पाहताच पळाली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सानपाडा सेक्‍टर- 20 जवळील पाम बीचलगतच्या नाल्याजवळ मंगळवारी (ता.11) सकाळी मगरीचे दर्शन झाले. यापूर्वीही जानेवारी महिन्यात या परिसरात मगर आढळल्याचे सांगण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का...

जवळपास दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात जुईनगरच्या या नाल्यात मगर आल्याचे सांगितले जात होते. याशिवाय अनेकदा जुईनगरच्या रेल्वे रुळाखालील नाल्यामध्ये देखील स्थानिकांना मगरीचे दर्शन झाले होते. त्यातच मंगळवारी सानपाडा सेक्‍टर- 20 जवळील पाम बीच लगतच्या नाल्याजवळ स्थानिक मनोज भोईर व त्यांच्या साथीदारांना मोठी, वजनदार मगर आढळली. नाल्याजवळ ती शांतपणे पहुडलेली होती. मात्र, हालचाल जाणवताच ती तेथून चपळाईने नाल्यात शिरली. 

ही बातमी वाचली का? सिंहगडापासून शिवरायांचा जयघोष

याबाबत स्थानिक मनोज भोईर यांनी सांगितले की, सकाळी साडेदहाच्या सुमारास नाल्याजवळ मगर दिसली. मागे जानेवारीतही जुईनगरजवळ मगर आढळली होती. मात्र, त्या मगरीपेक्षा मंगळवारी दिसलेली मगर खूपच मोठी आहे. जुईनगर स्थानकापासून सानपाडा डी-मार्ट येथून निघणारा नाला वळण घेऊन खाडीत जातो. येथे 2 मगरी असाव्यात असा अंदाज आहे. या नाल्यात म्हशी, डुकरे पाहण्यास मिळतात. परंतु म्हशींवर तेथील मगरी कधी हल्ला करत नाहीत. डुकरे, नाल्याजवळ असलेली कुत्रे, पिल्लांना ते आपले भक्ष्य करत आहेत. गावातील काही नागरिक मासेमारीसाठी जातात; मात्र त्यांनाही कधी उपद्रव झालेला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. 

ही बातमी वाचली का? चीनहून परतला, अन् त्याला भरली कोरोनाची धडकी!

कोल्हा, खवल्या मांजराचाही वावर 
याविषयी सानपाडा येथील स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख अजय पवार यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला. मिलेनिअम पार्क, रेल्वे कारशेडजवळ नाल्यात अधून-मधून मगर दिसत असल्याचे त्यांनीही नमूद केले. गेल्याच आठवड्यात पाम बीचजवळ दुचाकीला धडकून कोल्हा जखमी झाल्याचे आढळले होते. त्यापूर्वी वाशीलगतच्या खारफुटीत खवल्या मांजरही दिसले होते.