esakal | जनतेची दिशाभूल करू नका; त्यांच्या मनातील शंका दूर करा
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेची दिशाभूल करू नका; त्यांच्या मनातील शंका दूर करा

रेल्वेची तिकिट विक्री सुरू नसताना मजूरांकडून पैसे कोण घेत आहे? ही जनतेच्या मनातील शंका दूर करा, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केले आहे. 

जनतेची दिशाभूल करू नका; त्यांच्या मनातील शंका दूर करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वेची तिकिट विक्री सुरू नसताना मजूरांकडून पैसे कोण घेत आहे? ही जनतेच्या मनातील शंका दूर करा, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केले आहे. 

ही बातमी वाचली का? दहावी, बारावीच्या निकालांबाबत मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी एक चित्रफित प्रसिद्ध करून केंद्र सरकारवर टीका करत, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नयेत अशी मागणी केली. या संदर्भात माधव भांडारी म्हणाले की, देशमुख जनतेची दिशाभूल करत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून रेल्वे मंत्रालय ठिकठिकाणी अडकलेल्या मजूरांसाठी विशेष श्रमिक ट्रेन चालवत आहे. मात्र, रेल्वे तिकीट विक्री करत नसल्यामुळे मजूरांकडून पैसे घेण्याचा मुद्दाच उद्भवत नाही. रेल्वे केवळ राज्य सरकारच्या मागणीनुसार गाडी सोडण्याची व्यवस्था करते. प्रवाशांची यादी अंतिम करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. राज्य सरकारने यादी करून दिलेल्या प्रवाशांना रेल्वे गाडीतून घेऊन जाते. संबंधित प्रवाशांची कागदपत्रे तपासून खातरजमा करण्याचे काम देखील राज्य सरकारची यंत्रणा करते. रेल्वेचा या सर्व विषयात प्रवाशाशी थेट संबंध येतच नाही. त्यामुळे मजुरांकडे कोणी पैसे मागत असेल तर त्याची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच या मुद्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भांडारी यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का? अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पासची खैरात; प्रशासकिय कारभार चव्हाट्यावर 

केंद्र सरकारकडून विशेष रेल्वेगाड्या त्या-त्या राज्य सरकारच्या मागणीनुसार चालवल्या जात आहे. अशा गाडीच्या एकूण खर्चाचा 85% भार रेल्वे उचलत असून, केवळ 15% राज्य सरकारने उचलावा. अशी या गाड्यांची व्यवस्था आहे. देशातल्या सर्व राज्यांनी या व्यवस्थेला मान्यता दिलेली आहे. असे असताना रेल्वेने मजुरांकडे तिकिटाचे पैसे मागितले असे म्हणणे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. असेही माधव भांडारी यावेळी म्हणाले. 

loading image
go to top