esakal | Lockdown4.0 : चौथ्या लॉकडाऊनमध्ये होणार 'हे' मोठे बदल...
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown4.0 : चौथ्या लॉकडाऊनमध्ये होणार 'हे' मोठे बदल...

फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात लॉक डाऊन जारी करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा तिसरा टप्पा उद्या म्हणजेच १७ तारखेला संपुष्टात येणार आहे

Lockdown4.0 : चौथ्या लॉकडाऊनमध्ये होणार 'हे' मोठे बदल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात लॉक डाऊन जारी करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा तिसरा टप्पा उद्या म्हणजेच १७ तारखेला संपुष्टात येणार आहे. यापूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉक डाऊनची घोषणा केलीये. मात्र मोदींच्या माहितीप्रमाणे लॉक डाऊनचा चौथा टप्पा हा नव्या रंगातील आणि ढंगातील असणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनेही मोठी तयारी केलीये. 

अखेर निर्णय झाला, आता खाजगी डॉक्टरांना मिळणार PPE चे संरक्षण, पण अट आहे...

येत्या काळात म्हणजेच १८ मे या तारखेपासून सुरु होणाऱ्या कोरोनाच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन क्षेत्रांमध्ये लॉक डाऊनचे नियम अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मोठी शिथिलता  मिळू शकते. मुंबई आणि मुंबई MMR भाग, पुणे आणि पुणे MMR भाग, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. 

हेच ठरू शकतं कारण कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेचं, धारावीतल्या 'हाय रिस्क' झोनमधले कामगारही...

सध्या रेड झोनमध्ये असणाऱ्या भागांसंदर्भातील नियमांमध्ये देखील काही बदल होण्याची होण्याची शक्यता आहे. रेड झोनच्या सध्याच्या नियमावलीत काही बदल करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यत्त्वे गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालीये. अशात राज्याचं अर्थचक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी काही बदल अपेक्षित आहेत. तिसऱ्या टप्प्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन तयार करून अटी शिथील करण्यात आल्या होत्या. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्येही राज्यात मोठे बदल होण्याची चिन्ह आहे.

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा चौथा टप्पा नेमका कसा असेल माहिती देण्याची शक्यता आहे. 

to start maharashtras economic wheels rolling state government might take important decisions