esakal | ED प्रकरणावरून केंद्रासोबतचा संघर्ष होणार तीव्र, पश्चिम बंगालच्या मार्गाने जाण्याचा सेनेचा कल 
sakal

बोलून बातमी शोधा

ED प्रकरणावरून केंद्रासोबतचा संघर्ष होणार तीव्र, पश्चिम बंगालच्या मार्गाने जाण्याचा सेनेचा कल 

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसीनिमित्ताने शिवसेनेचा केंद्र सरकारशी सुरु असलेला संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ED प्रकरणावरून केंद्रासोबतचा संघर्ष होणार तीव्र, पश्चिम बंगालच्या मार्गाने जाण्याचा सेनेचा कल 

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई, ता.30:  महाविकास आघाडी सरकारचे प्रवर्तक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसीनिमित्ताने शिवसेनेचा केंद्र सरकारशी सुरु असलेला संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेंस या दोन्ही घटक पक्षांनी राऊतांना पाठिंबा दिल्यावर शिवसेनेच्या बडया नेत्यांनी सक्रीयपणे ईडीप्रकरणाला विरोध करण्याचे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे व्यक्त केले आहे.वर्षा राऊत  हजर झाल्या नाहीत तर काय याचा अंदाजही घेण्यात येत असल्याचे समजते.

यापूर्वी दोनदा त्या हजर राहिल्या नाहीत.आता त्यांचे प्रतिनिधित्व त्यांचे सनदी लेखापाल करू शकतील काय असा प्रश्न ईडीला विचारला गेला होता. मात्र, तशी सवलत देणे शक्य नाही. हजर होण्यासाठी दोन तीन दिवसांचा अवधी मात्र दिला गेला आहे.

महत्त्वाची बातमी : लोकल प्रवास धोक्‍याचा; लुटमारी विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवासी भयभीत

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचौकशीचा फेरा लागला तेंव्हा हा विषय त्यांनी व्यक्तीगत पातळीवर हाताळावा की पक्षाने सक्रीय व्हावे याची चर्चा झाली होती.त्यावेळी कोणताही निर्णय झाला नसला तरी या वेळी मात्र वर्षा राऊत यांची चौकशी हा महाविकास आघाडी सरकारवर आणला गेलेला दबाव असल्याचे ट्वीट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाचे समर्थन राऊतांना मिळेल असा त्यातून अर्थ निघत असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. दरम्यान संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वडिलांवरून हिणवल्याने भाजप त्यांच्यासंदर्भात आक्रमक टिका करेल हे स्पष्ट आहे.
पीएमसी बॅंकेत जी ५५ लाखांची रक्कम तिचा स्त्रोत वर्षा राऊत यांना उघड करावा लागेल असे ईडीतील सुत्रांनी सांगितले.

New Year 2021 | मॉल-सुवर्णपेढ्या उजळल्या; पण बाजार फिकाच! नववर्ष स्वागताच्या उत्साहावर कोरोनामुळे विरजण

या प्रकरणाचे परिणाम तसेच यात अन्य नावे समोर आली तर काय करायचे याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. मंत्री अनिल परब, खासदार निल देसाई, विनायक राऊत आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांनीही यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे असे सुत्रांनी सांगितले. 

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

( संपादन - सुमित बागुल )

Conflict with Center over ED issue intensifies Shiv Sena tends to go the way of West Bengal 

loading image