दस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने बुधवारी (ता. १४) डोंबिवली पूर्वेकडील दस्तनोंदणी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात २७ गावांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

दस्तांची नोंदणी बंद असल्यामुळे सरकारचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे नोंदणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. अनेकदा इशारे देऊनही दस्तनोंदणी सुरू झाली नसल्यामुळे मोर्चा काढावा लागला, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची कल्पना असल्याने पोलिसांनी गांधीनगर परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता. या वेळी मोर्चेकऱ्यांनी २७ गावांसाठी वेगळ्या नगरपालिकेची मागणीही यावेळी  केली.

मोर्चात माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, संघर्ष समितीचे पदाधिकारी गंगाराम शेलार, गुलाब वझे, दत्ता वझे, अर्जुनबुवा चौधरी, चंद्रकांत पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील, गजानन मांगरुळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यासोबत बैठक?
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संघर्ष समितीचे निवेदन स्वीकारले. दस्तनोंदणी आणि वेगळ्या नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Conflict Committee's Front Against Registration Closure