‘मोदी’ वेब सीरिजबाबत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली; परंतु रस्त्यांवर जाहिराती दिसणाऱ्या वेब सीरिजबाबत अद्याप संभ्रमच आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट गुरुवारी (ता. ११) प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट लोकसभा निवडणूक संपल्यानंतर प्रदर्शित होणार आहे. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिला आहे. निवडणुकीदरम्यान राजकीय नेत्यावरील चित्रपट प्रदर्शित होणे हे आचारसंहितेचा भंग होण्यासारखे आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. परंतु ‘मोदी : जर्नी ऑफ ए कॉमन मॅन’ या वेब सीरिजबाबत अद्याप संभ्रम आहे. लोकसभा निवडणुकीला आठवडा असताना प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या जाहिराती मुंबईत अनेक ठिकाणी दिसत आहेत.‘इरॉस नाऊ’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या वेब सीरिजचे पहिले पाच भाग प्रदर्शित करण्यात आले. ही १० भागांची मालिका मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे.

Web Title: The confusion about the 'Modi' web series