काँग्रेसच्या साहसवादाला शिवसेनेचा विरोध? विधान परिषदेवरील उमेदवारांवरुन गोंधळ

mahavikas aghadi
mahavikas aghadi

मुंबई : महाविकास आघाडीत आपल्याला योग्य मान मिळायला हवा या आग्रहापोटी विधानपरिषद निवडणुकीत दुसरा उमेदवार दाखल करण्याच्या कॉंग्रेसच्या निर्णयाला महाविकास आघाडीची मान्यता नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या संसर्गछायेत होणारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न सुरू असताना केंद्रीय नेत्यांच्या आग्रहामुळे कॉंग्रेसने पापा मोदींना रिंगणात उतरवले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अधिकचा एक उमेदवार दिला होता. ते लक्षात घेत परिषदेत आम्हाला दोन जागा लढू द्या हा कॉंग्रेसचा आग्रह आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेटाळून लावला. दोन जागांसाठी आम्हाला केवळ चार अतिरिक्त मतांची गरज असल्याचे विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. कॉंग्रेसला त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी १४ मते हवी आहेत. ही मते मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील असे कॉंग्रेस श्रेष्ठींचे मत आहे.

त्यातच राज्य कॉंग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या विरोधातला गट आपण भाजपचा चौथा उमेदवार पाडू शकतो असे सांगत आहे. या परिस्थितीत दोन जागा मिळायलाच हव्यात असे दिल्लीतून कळवण्यात आले आहे. मतांच्या बेगमीसाठी आज रात्री कॉंग्रेसने सेनेशीही संपर्क साधला. सेनानेते मिलिंद नार्वेकर यांना यासंदर्भात विचारले असता आमच्या पक्षाची मते अन्य कुणालाही हस्तांतरीत केले जाणार नाहीत एवढेच सांगतो अशी एका वाक्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Confusion in Congress Shiv Sena over candidates on Legislative Council

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com