लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कानावर फक्त एकच शब्द वारंवार पडतोय आणि तो म्हणजे 'लॉकडाऊन'. कोरोनापेक्षा लॉकडाऊनची भीती आता लोकांना सर्वात जास्त वाटत आहे.

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कानावर फक्त एकच शब्द वारंवार पडतोय आणि तो म्हणजे 'लॉकडाऊन'. कोरोनापेक्षा लॉकडाऊनची भीती आता लोकांना सर्वात जास्त वाटत आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्या आणि व्यवसाय सर्व काही बंद आहे. याचा त्रास नोकरी करणाऱ्या लोकांना झालाय. मात्र लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका नोकरी शोधणाऱ्या लोकांना झालाय.

हे ही वाचा : अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची युवा सेनेची यूजीसीकडे मागणी

लॉकडाउनच्या या कठीण काळात नोकरी कशी मिळणार ? अजून किती दिवस हे चालणार ? लॉकडाऊननंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होतील का ? असे अनेक प्रश्न सध्या नोकरी शोधणाऱ्या लोकांच्या मनात आहेत. त्यात भर म्हणून राज्य सरकारनं पुढच्या एक वर्षात सरकारी भरती होणार नाही असं जाहीर केलं आहे. त्यामुळे नोकरी शोधणारे लोकं अजूनच हतबल झाले आहेत. मात्र आता घाबरून जाऊ नका. या लॉकडाउनच्या कठीण काळात नोकरी कशी शोधायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे खचून जाऊ नका. काही सोप्या पद्धतींचा विलंब करा आणि तुम्ही नोकरीच्या संधी प्राप्त करा.

मोठी बातमी : अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

संयम ठेवा

हा लॉकडाऊनचा काळ जसा तुमच्यासाठी कठीण आहे तसाच कंपन्यांसाठीही आहे.  साधारपणे कंपनी तुमची प्रोफाइल पाहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला काही दिवस घेते. मात्र या लॉकडाऊनमुळे त्याला उशीर होऊ शकतो.  लॉकडाऊनमध्ये कंपन्याही आर्थिक समस्यांमधून जात आहे त्यामुळे  नवीन लोकं घेण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असू शकतो. मात्राब  तुम्ही तुमचा संयम सोडू नका. कंपनीच्या लोकांसोबत सतत संपर्कात राहा. तुमच्या प्रोफाइल आणि नोकरीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेत राहा. या लॉकडाउनच्या काळात संयम ठेवला तरच नोकरी प्राप्त होऊ शकेल.

मोठी बातमी : धक्कादायक ! कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

नेटवर्किंग वाढवा

अमेरिकेच्या कर्मचारी संघाच्या  २०१६ च्या एका अभ्यासानुसार ७० टक्के लोकांना त्यांच्या संपर्कामुळे किंवा नेटवर्किंगमुळे नोकरी मिळते. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमचं नेटवर्किंग वाढवण्यावर भर द्या. नेटवर्किंग वाढवताना अशा लोकांशी संपर्क साधा जे तुम्हाला नोकरी मिळण्याबाबत तुमची सहाय्यता करू शकतात. लॉकडाऊनच्या या काळात तुम्ही बाहेर जाऊन, कोणाला प्रत्यक्ष भेटून, कंपनीत जाऊन किंवा कुठल्या कार्यक्रमांना जाऊ शकत नाही. मात्र सोशल मीडिया किंवा ई-मेलच्या माध्यमातून तुमचं नेटवर्किंग वाढवा. तुमची ओळख वाढवा ज्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्यात त्रास होणार नाही. त्यामळे तुमच्या नेटवर्किंगवर अधिक प्रमाणात भर द्या.

महत्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाकडून 158 परीक्षांचे नियोजन सुरू, वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

तुम्ही आधी केलेलं दाखवा

तुम्हाला देऊ इच्छिणारे लोकं सतत तुमच्यात काही असामान्य गुण आहे का किंवा तुमच्याजवळ अनुभव आहे का  हा विचार करत असतात. त्यामुळे जर तुम्ही अनुभवी असाल तर त्यांना तुमचं काम नक्की दाखवा आणि त्याबद्दल माहिती द्या. जर तुमच्या कुठल्याही प्रकारचा अनुभव नसेल तर लॉकडाउनच्या काळात तुमची प्रोफाइल अजून चांगली करण्यावर भर द्या. तुम्ही केलेलं काम जगाला कळू द्या.

नक्की वाचा : मुंबईतील सर्व विभागांत रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, भाजप नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

तुमच्या कामात अव्वल राहा

तुम्ही ज्या कंपनीत काम करू इच्छिता त्या कंपनीत लॉकडाऊनमुळे नवीन लोकं घेण्यात थोडा वेळ लागू शकतो. मात्र तुम्ही तिथे असलेल्या HR शी संपर्कात राहा. कंपनी लॉकडाऊन नंतर मुलाखात घेणार असेल तर त्यांच्या अपेक्षांविषयी माहिती घेऊन ठेवा. तुमच्या कामात तुम्ही अव्वल राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात क्षमता असेल तर या कठीण काळातही तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा.

Can't get a job due to lockdown, Don't be afraid, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can't get a job due to lockdown, Don't be afraid, read full story