अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

st
st

मुंबईः महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन आहे. सध्या या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी, पर्यटक राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकले. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात शिथिलता उठवण्यात आली. त्यामुळे या अडकलेल्या नागरिकांसाठी आजपासून एसटी महामंडळाकडून मोफत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

आतापर्यंत राज्यातून परराज्यांमध्ये जाण्यासाठी रेल्वे आणि बसेसची सोय करण्यात आली होती. मात्र आता राज्यातच विविध जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदाच अशी सोय करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसंच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे आजपासून मोफत बस सेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी दिली. 

असा असेल एसटी प्रवास 

फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करत एका बसमधून केवळ 22 प्रवासीच प्रवास करतील. ऑनलाइन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात आलं असून ते पोर्टल आजपासून सुरु झालं आहे. ही मोफत सेवा केवळ तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये म्हणजेच येत्या 18 मेपर्यंतच ही मोफत सेवा लागू असणार आहे. 

या मोफत सेवेत प्रत्येक सीटवर एक प्रवासी बसून प्रवास करेल. यामुळे एका बसमध्ये साधारणपणे 21 ते 22 लोक बसू शकतात. जर 21- 22 लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलिस आयुक्त कार्यालय आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावीत. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.

ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी 

जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर नाव नोंदणी करावी. हे पोर्टल आजपासून सुरु झालं आहे. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

हेल्पलाईन नंबरही उपलब्ध 

आगार दूरध्वनी क्रमांक पोर्टलला एका हेल्पलाइनद्वारे जोडले जाणार आहे. त्या हेल्पलाइनवर प्रवासी आपल्या शंका आणि त्यांची वैयक्तिक माहिती देऊ शकतील. 

मुंबईतल्या आगारातील नियंत्रण कक्षात असा साधा संपर्क 

  • विद्याविहार - 022-25101182
  • मुंबई आगार- 022-23072371
  • परळ आगार- 022-24304620
  • कुर्ला नेहरूनगर आगार- 022-25522072
  • पनवेल आगार- 022-27482844
  • उरण आगार- 022-27222466

प्रवास करतानाचे एसटीची नियम खालीलप्रमाणे 

या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढताना हात सनिट्झरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे.
बस निघण्यापूर्वी आणि पोहचल्यानंतर सॅनिटाईज करण्यात येईल.
ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचं अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.
ही मोफत बस सेवा पॉईंट टू पॉईंट सेवा असेल. या प्रवासा दरम्यान कुठे प्रवाशांना कुठेही उतरता किंवा चढता येणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नसल्यानं आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे.
प्रवासादरम्यान फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरण्यात येणार आहे. 

कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. कटेंनमेंट झोनव्यतिरिक्त कोणाला जायचे असेल, त्यांना जाता येणार आहे. त्यामुळे, सर्वांनी या नियमांप्रमाणे योग्य माहिती भरून जाण्याचा मार्ग सुकर करावा असं आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं आहे. तसंच थर्मल स्क्रीनिंग, तपासणी केल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. एसटी बस कुठून आणि किती वाजता निघेल याबाबतची माहिती प्रवाशांना मोबाइलवर दिली जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. तर या प्रवासादरम्यान कृपया पोलिस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

if you want to go at your village, contact with ST Corporation to go home

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com