esakal | शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत नियोजनाचा अभाव; रायगड जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संताप
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत नियोजनाचा अभाव; रायगड जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संताप

चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाच्या अभावासह काही ठिकाणी फक्त अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी करून देण्याचे आदेश आदी बाबींमुळे रायगड जिल्ह्यात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.

शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत नियोजनाचा अभाव; रायगड जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संताप

sakal_logo
By
अमित गवळे

पाली : कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवार (ता. 23) पासून सुरू होणार ओहत. त्यासाठी शिक्षकांना कोरोना चाचणी आवश्‍यक आहे; मात्र चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाच्या अभावासह काही ठिकाणी फक्त अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी करून देण्याचे आदेश आदी बाबींमुळे रायगड जिल्ह्यात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा - यंदा महापरिनिर्वाणदिनाचे थेट प्रक्षेपण; शिवाजी पार्कवर नागरी सुविधा नाही

कोरोना चाचणी आवश्‍यक असल्याने शिक्षकांच्या चाचणी केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. कर्जत येथील चाचणी केंद्रावर गुरुवारी प्रचंड गर्दी आणि गोंधळ झाला. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला होता. काही ठिकाणी तर दुसऱ्या तालुक्‍यात राहणाऱ्या शिक्षकांना त्यांची शाळा असलेल्या तालुक्‍यात चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या शिक्षकांची गैरसोय झाली आहे. आठवीपर्यंतच्या शिक्षकांनाही चाचणी 22 तारखेपर्यंत करणे सक्तीचे केल्याने केंद्रावर आणखी गर्दी होत आहे. हे शिक्षक सध्या ऑनलाईन शिकवत आहेत. 
दरम्यान, पनवेल महापालिकेने तर पत्रक काढून फक्त अनुदानित शाळांची मोफत कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी ही उपजिल्हा व महापालिका रुग्णालयात होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे विनाअुदानित, अंशतः अनुदानित व स्वयम्‌ अर्थसहाय्य शाळांनी त्यांच्या शिक्षकांच्या चाचण्या स्वतः करून घेण्याचे सांगितले आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

हेही वाचा - 1 लाख मुंबईकरांनी केली कोविडची नि:शुल्क चाचणी; 244 मोफत कोविड चाचणी केंद्रांना भरभरून प्रतिसाद

16 शिक्षक पॉझिटिव्ह 
पनवेल येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली. 64 शिक्षकांपैकी 16 पॉझिटिव्ह आहेत; तर शुक्रवारी चाचणी केलेल्या सुमारे 105 शिक्षकांच्या चाचणीचा अहवाल प्रलंबित आहेत. 

कोरोना चाचणीबाबत तालुक्‍याबाहेर राहणाऱ्या शिक्षकांची मोठी गैरसोय झाली. याबरोबरच हे सर्व नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्‍यक होते. 
- कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली 

सर्व शिक्षकांची चाचणी मोफत करणे आवश्‍यक आहे. तसेच शिक्षक संख्या जास्त असलेल्या शाळेतच चाचणी घेण्याची व्यवस्था करणे आवश्‍यक होते. याबरोबरच चाचणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग आणि नियोजन आवश्‍यक आहे. 
- दीपक घोसाळकर,
शिक्षकेतर कर्मचारी, पनवेल 

confusion over teacher corona testing Anger in Raigad district due to lack of planning 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top