1 लाख मुंबईकरांनी केली कोविडची नि:शुल्क चाचणी; 244 मोफत कोविड चाचणी केंद्रांना भरभरून प्रतिसाद

1 लाख मुंबईकरांनी केली कोविडची नि:शुल्क चाचणी; 244 मोफत कोविड चाचणी केंद्रांना भरभरून प्रतिसाद

मुंबई, 21 : मुंबई महापालिकेने मुंबईत सुरू केलेल्या नि:शुल्क कोविड चाचणी केंद्रांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी मुंबईतील विविध चाचणी केंद्रांवर जाऊन आपली तपासणी केली आहे.

मुंबईकरांना कोरोना चाचणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेने शहरातील 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. कोरियन देशाच्या मॉडेलच्या अनुषंगाने पालिकेने विविध ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू केली असुन एकूणच मुंबईत अशी 300 केंद्रे आहेत जिथे आरटीपीसीआर आणि कोरोनाची जलद चाचणी घेतली जात आहे. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी त्यांची तपासणी केली आहे. या तपासणीत 2 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. संसर्गग्रस्त आढळलेल्यांना तातडीने उपचारांसाठी पाठवण्यात आले.

स्थलांतरीत करणार्यांवर पालिकेची नजर - 

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातून मुंबईत येणार्‍या लोकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे' या मोहिमेअंतर्गत आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. आम्हाला अनेक घरे बंद अवस्थेत आढळली. बरेच लोक अजूनही त्यांच्या गावातून परत आले नाहीत. काही हेल्थकेअर वर्कर्स बंद घरांवर नजर ठेऊन आहेत. जर कोणी दुसर्‍या राज्यातून आले तर त्याची प्राथमिक चाचणी जसे की शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी इत्यादी तपासल्या जातील. आम्हाला लोकांना आवाहन करायचे आहे की, जर इतर कोणतेही राज्यातून अलीकडेच मुंबईत आले असेल तर त्यांनी विनामूल्य कोविड चाचणी केंद्रात जाऊन त्यांची तपासणी करावी. 

एकही कोविड केंद्र बंद करणार नाही - 

कोरोनाचे रुग्ण कमी झाले तरी डिसेंबरपर्यंत एकही कोविड केंद्र बंद करणार नाही, असा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन सज्ज आहे. शिवाय, सर्व प्रकारची औषधं, पीपीई किट्स, बेड्स सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्यामूळे, लोकांना काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

so far more than one lac people have done free covid test in mumbai two percent found positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com