esakal | मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

sakal_logo
By
सुमित सावंत

मुंबई: मुंबईत पुढच्या काही दिवसात उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव देण्यावरुन वाद रंगण्याची शक्यता आहे. गोवंडी (govandi) येथील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी (ruksana siddiqui) यांनी साहीनाका डम्पिंग रोड इथल्या पालिका उद्यानाला टिपू सुलताना यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. पालिका प्रशासनाने (bmc administration) या मागणीला सकारत्मकता दर्शवत हिरवा कंदील दर्शवलाय. पण हिंदू जनजागृती समिती (Hindu janjagruti samiti) आणि अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन उद्यानाला टिपू सुलताना याचे नाव देण्यास विरोध केलाय. (Row over Tipu Sultan name to garden pro hindutva organisations oppose to demand dmp82)

या उद्यानाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव द्यावे. अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी पालिकेला दिला आहे. पालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे आता या विषयाला व त्यावरील प्रशासकीय अभिप्रायाला विरोध करणे शिवसेनेला भाग पडणार आहे. जर विरोध केला नाही तर शिवसेनेची सत्ता असताना असा प्रस्ताव मंजूर झालाच कसा, असे प्रश्न उपस्थित होऊन हिंदुत्ववादी संघटनांकडून जाब विचारला जाण्याची व यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही - मनसे

रुक्साना सिद्दीकी यांनी, २५ जानेवारी २०२१ रोजी ठराव मांडून गोवंडी येथील प्रभाग क्र.१३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबत बाजार व उद्यान समिती अध्यक्ष यांच्याकडे मागणी केली होती. टिपू सुल्तान हा भारतीय क्रांतीसेनानी होता. दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रांताचा तो राजा होता.

हेही वाचा: शरद पवार राष्ट्रपती होणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं उत्तर

पालिका आयुक्तांनी १० जून रोजी सकारात्मक अभिप्राय दिले आहेत. सदर उद्यानाचा भूभाग हा उद्यानासाठीच आरक्षित होता. त्यामुळे या उद्यानाचे " टिपू सुलतान" असे नामकरण करण्यास बाजार व उद्यान समितीने मान्यता द्यावी, अशी शिफारस आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात केली आहे.

loading image