मुंबईत काँग्रेसला झटका; आजी-माजी नगरसेवकांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नेहमीच तुम्हाला जनतेचा विचार करावा लागतो.आपलं बहुमूल्य मत देऊन आपल्यावर विश्वास दाखविणाऱ्या जनतेच्या भल्यासाठी काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात.

मुंबई : काँग्रेसचे मानखुर्द, वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नेहमीच तुम्हाला जनतेचा विचार करावा लागतो.आपलं बहुमूल्य मत देऊन आपल्यावर विश्वास दाखविणाऱ्या जनतेच्या भल्यासाठी काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य, उत्तर मुुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य या पदांचा राजीनामा देण्याचा निर्णयही याच अपरिहार्यतेतून मी घेतला आहे. माझ्या समवेत माझी पत्नी, माजी नगरसेविका सुनंदा लोकरे यांनीही काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.आमची कोणाबाबतही तक्रार नाही. हा निर्णय  सदैव आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या जनतेच्या भल्यासाठीच घेतला असल्याचे विठ्ठल लोकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress corporaters resigns in Mumbai