'सुबह का भुला शाम को वापस आया' 

शाम देऊलकर
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

'सुबह का भुला शाम को वापस आया' असेच मला भामरा यांच्याविषयी म्हणायचे आहे. तसेच भाजपबाबत असलेल्या आकर्षणाचा फुगा लवकरच फुटेल. मुंबईकर सुजाण असुन ते भाजपला कधीही मुंबईच्या सत्तेवर आणणार नाहीत. 
- अस्लम शेख, स्थानिक कॉंग्रेस आमदार

भाजपवासी नगरसेवक पुन्हा कॉंग्रेसमध्ये 
मुंबई : भाजपत प्रवेश केलेले नगरसेवक परमिंदर भामरा यांनी "यु टर्न' घेऊन पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन विषय मिळाला आहे. उमेदवारी मिळण्याच्या आशेने प्रवेश केलेल्या भामरा यांना फसवणुकीचा अनुभव आल्याने त्यांनी पुन्हा स्वपक्षाची वाट धरल्याचे समजते. 

महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसे नगरसेवकांनी शिवसेना व भाजपत प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. सहसा दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना नगरसेवक उमेदवारीची खात्री करूनच प्रवेश करत असतो, परंतु मालाड पश्‍चिम एव्हरशाईन नगर प्रभाग क्र. 31 चे नगरसेवक परमिंदर खुराणा यांना वेगळा अनुभव आला. त्यांचा वॉर्ड महिला राखीव झाला असल्याने त्यांनी आपल्या पत्नीसाठी कॉंग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले होते. परंतु स्वपक्षाकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु भाजपमध्येही पत्नीला उमेदवारी मिळण्याची खात्री न वाटल्याने ते स्वगृही परतले.त्यांच्या या प्रवेशावेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, स्थानिक आमदार अस्लम शेख उपस्थित होते. 

'सुबह का भुला शाम को वापस आया' असेच मला भामरा यांच्याविषयी म्हणायचे आहे. तसेच भाजपबाबत असलेल्या आकर्षणाचा फुगा लवकरच फुटेल. मुंबईकर सुजाण असुन ते भाजपला कधीही मुंबईच्या सत्तेवर आणणार नाहीत. 
- अस्लम शेख, स्थानिक कॉंग्रेस आमदार

Web Title: congress corporator returns back home from bjp