
डोंबिवली : कल्याण येथील तरुणीला मारहाण प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नागरी विकास सेलचे अध्यक्ष नविन सिंग यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पक्षामुळे राज्यात जो भाषिक व प्रांत वाद निर्माण होत आहे, तो वेळीच रोखला पाहिजे. सत्ताधारी पक्षाकडून हे राजकारण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासन यांना माझी विनंती आहे की, जे कोणी पक्ष हा वाद निर्माण करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.