
उल्हासनगर : जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे उल्हासनगर शहराची कमालीची दुरावस्था झाली आहे. मात्र याची रॅप सॉंगद्वारे पोलखोल करून प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सिंगर कुलदीपसिंग लबाना यांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सत्कार केला आहे. फॉरवर्ड लाईन परिसरातील एका छोट्याश्या घरात म्यूजिक स्टूडियो चालवून रॅम्प गाणे तयार करण्याचे काम कुलदीपसिंग लबाना करत आहेत.