esakal | 'हा' कॉंग्रेस नेता म्हणतोय 'शिवसेना' तर सर्वसमावेशक पक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

'हा' कॉंग्रेस नेता म्हणतोय 'शिवसेना' तर सर्वसमावेशक पक्ष

'हा' कॉंग्रेस नेता म्हणतोय 'शिवसेना' तर सर्वसमावेशक पक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : जशी जशी 9 तारीख जवळ येतेय तशी तशी महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. यातच काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांची  सामना कार्यालयात पोहोचलेत. 

गेल्या काही दिवसात दलवाई यांनी कॉंग्रेस हाय कमांडला पत्र लिहून शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल विचारणा केलीये. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता.   शिवसेना हा हिंदुत्त्ववादी पक्ष जरी असला तरीही आता शिवसेना सर्वसमावेशक झालाय. त्यामुळे सेनेकडून असा प्रस्ताव आल्यास शिवसेनेला पाठींबा द्यावा अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे   

भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही

कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही, अशी भूमिका काँग्रेसची ठरली असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. मात्र, या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.  48 तासात चित्र स्पष्ट होईल असं सांगत त्यांनी सेनेसोबत जाण्याचे अप्रत्येक्ष संकेतही दिले

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच ही सर्वस्वी भारतीय जनता पक्षाची चूक आहे. महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेसला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य बजावणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणालेत. 

Webtitle : congress leader met sanjay raut at samana office mumbai