
भाईंदर : भाजपकडून करण्यात आलेली मतांची चोरी हे देशावरचे अतिक्रमण आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मिरारोड येथे केला. आता दुसरा स्वातंत्र्य लढा लढण्याची वेळ आमच्यावर आली असून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढत राहील, असे सचिन सावंत यांनी वेळी सांगितले.