राजकीय हालचाली पाहता काँग्रेसचा 'हा' बडा नेता म्हणतोय, "आता काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं"

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मे 2020

कोरोनाचा संकटाचा सामना करता करता आता राज्यातल्या राजकारणाची घडी बिघडल्याचं चित्र आहे.

मुंबई- कोरोनाचा संकटाचा सामना करता करता आता राज्यातल्या राजकारणाची घडी बिघडल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक मोठं वक्तव्य केलं. काँग्रेसनं सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला संजय निरुपम यांनी काँग्रेसला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. त्यातच संजय निरुपम यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

काँग्रेसला विश्वासात न घेता सरकारमध्ये काहीतरी शिजतंय असा आरोप निरुपम यांनी केला आहे. तसंच सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षातल्या नेत्यांसोबतही चर्चा केली पाहिजे, असंही ते म्हणालेत. 

मोठी बातमी - थरकाप उडवणारा फोटो : KEM रुग्णालयातील शवागृह भरलं, मृतदेह ठेवलेत चक्क 'इथे'...

काय म्हणाले संजय निरुपम ?

गेल्या 60 दिवसांमध्ये 60 हून जास्तवेळा फ्लिप फ्लॉप झाले आहेत. सकाळी काही तरी वेगळा निर्णय घेतात तर संध्याकाळी काही तरी दुसरा निर्णय घेतलेला असतो. यामुळे सरकारला यश मिळालं नसल्याचं चित्र आहे. म्हणूनच मी काँग्रेसला विनंती करतो की, लवकरच सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला दिला आहे. 

शरद पवार आणि राज्यपालांच्या भेटीवर भाष्य 

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावरही संजय निरुपमांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतली त्यामुळे त्या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये काय खिचडी पकली यांची मला कल्पना नाही. त्या भेटीनंतर पवारसाहेब मातोश्रीवर गेले. तिथेही मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात काय खिचडी पकली याबाबतची मला जास्त माहिती नाही. पण एक आहे सत्ता मिळवण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात हे नाकारू शकत नाही, असं म्हणत संजय निरुपमांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

मोठी बातमी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात... 

रेल्वेमंत्र्यांची पाठराखण 

मजुरांना घरी पाठवण्याचा जो मुद्दा सध्या राज्यात सुरु आहे. त्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. रेल्वेमंत्र्यांसोबत जो वाद झाला तो हास्यास्पद असल्याचंही ते म्हणालेत. ट्रेनसाठी आजही लोकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

congress leader is saying congres should come out of mahavikas aaghadi red full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader is saying congres should come out of mahavikas aaghadi red full news