थरकाप उडवणारा फोटो : KEM रुग्णालयातील शवागृह भरलं, मृतदेह ठेवलेत चक्क 'इथे'...

थरकाप उडवणारा फोटो : KEM रुग्णालयातील शवागृह भरलं, मृतदेह ठेवलेत चक्क 'इथे'...

मुंबई : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत चालले असून पुढे परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची भीती व्यक्त होत आहे. आज मुंबईत बाधित रुग्णांचा आकडा 31 हजाराच्या वर गेला आहे तर 1026 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा ही वाढत असल्याने शवागृह भरल्याने मृतदेह आता बाहेरच्या कॉरिडोरमध्ये ठेवावी लागत आहेत. केईएम या महत्त्वाच्या रुग्णालयातील ही विदारक परिस्थिती असून अश्याच प्रकारे इतर रुग्णालयांत देखील अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईतील KEM रुग्णालय हे कोरोना संबंधित महत्त्वाच्या रुग्णालयांपैकी एक आहे. यामध्ये कोरोना संबंधित रुग्ण मोठ्या प्रमाणात भरती केलेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढतेय. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे आकडे देखील वाढतायत. मात्र दररोज वाढणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणामुळे शवागृहाची क्षमता संपली आहे. त्यामुळे अनेक मृतदेह मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

KEM रुग्णालयात सध्या एकूण 37 मृतदेह आहेत. त्यातील 10 मृतदेह सध्या केईएमच्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांत शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवागृहात जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी या कात्रीत प्रशासन सापडल्याचे दिसून येत आहे.   

मुंबईत रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण ही वाढले असून मुंबईतील मृतांचे प्रमाण हे 3.2 टक्क्यांवर गेले आहे. मृतदेहांची हेळसांड होऊ नये, ताबडतोब विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाने एक समिती देखील नियुक्त करून नवीन नियमावली बनवली आहे. तरी देखील मयतांचा कुटुंबियांकडून प्रतिसाद न मिळणे, पोलिस पंचनाम्याला उशीर होणे, दहन भूमीमधील गर्दी यांमुळे मृतदेह रूग्णालयातच बराच वेळ ठेवावे लागतात. यामुळे मृतदेह पडून राहण्याच्या घटना वाढत असून या समस्या रुग्णालय प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

bodies of those who lost their lives kept in the corridor of KEM hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com