तडकाफडकी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते का गेलेत दिल्लीला ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे काही नेते दिल्लीला रवाना झालेत. दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भेट घेणार आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे काही नेते दिल्लीला रवाना झालेत. दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भेट घेणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील सत्ता स्थापनेच्या तिढा न सुटल्यास काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा ही भूमिका मांडण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झालेत. 

"भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नसतील तर शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आपण पुढे यायचे नाही" असं, कॉग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कळवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजत होतं. शिवसेना आणि भाजप यांचे एकमेकांशी पटणार नसेल तर आपण सेनेच्या पाठीशी उभे रहायचं का ? 

संजय राऊत शरद पवार भेट, महाराष्ट्रातील नवी राजकीय समीकरणं ?

अशी विचारणा महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी केली होती. त्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. आता  शिवसेना आणि भाजपमधील सत्ता स्थापनेच्या तिढा न सुटल्यास काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा ही भूमिका मांडण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झालेत. 

तर इथे शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर शरद पवार, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे  हे उपस्थित आहे. 

WebTitle : congress leaders went to delhi to meet congress high command 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leaders went to delhi to meet congress high command