"महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवायलाच हवा, कारण..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते असलम शेख यांनी दिलं उत्तर

"महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवायलाच हवा, कारण..."

मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाउन (Maharashtra lockdown) ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) सर्वच मंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन वाढणार हे नक्की असून याबाबतची नियमावली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) २ दिवसात जाहीर करणार आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन वाढवणं का गरजेचं आहे, याचं कारण राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितलं. (Congress Minister Aslam Shaikh Explains why Maharashtra Lockdown Extension is necessary)

हेही वाचा: महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार?

"राज्यात असलेला लॉकडाउन नक्कीच वाढला पाहिजे. मला वैयक्तिकदृष्ट्या असं वाटतं की राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ केली जावी. कारण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जी तयारी राज्याला करायची आहे, ती करण्यासाठी या वाढीव लॉकडाउन फायदा होईल", असं असलम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं. "राज्याला आणि नागरिकांना तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जे लोक कोविड नियमांचे पालन करत नाहीत, त्यांची अवस्था किती दयनीय होते हे आपण पाहिले आहे", अशा शब्दात त्यांनी नागरिकांना सावधदेखील केले.

हेही वाचा: कोरोनाला रोखण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा लॉकडाउन गरजेचा : ICMR

"केंद्र सरकारने आता राज्यांना मदत करण्यासाठी स्वत:हून पुढे यायला हवं. लसींचे डोस खरेदी करण्याबाबतच्या निर्बंधांमध्ये केंद्र सरकारने शिथिलता आणायला हवी. जर केंद्र सरकारने लसींच्या आयातीवरील निर्बंध काही अंशी शिथील केले, तर आम्ही राज्यातील संपूर्ण जनतेचं लसीकरण ३ ते ४ महिन्यात पूर्ण करू", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१८+ च्या लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय

कॅबिनेट बैठकीत राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या वयोगटाचं लसीकरण स्थगित करण्यात आलं आहे. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्या वयोगटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची लवकर अपेक्षा करु नका, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Congress Minister Aslam Shaikh Explains Why Maharashtra Lockdown Extension Is

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra News
go to top