esakal | मोठी बातमी - मुंबईत पुन्हा राजकीय खलबतं, आता बाळासाहेब थोरातांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट...

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - मुंबईत पुन्हा राजकीय खलबतं, आता बाळासाहेब थोरातांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट...

महसूल खात्यात काही महत्त्वाच्या बदल्या या ३१ जुलै पर्यंत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील बदल्यांच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय

मोठी बातमी - मुंबईत पुन्हा राजकीय खलबतं, आता बाळासाहेब थोरातांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट...
sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात पुन्हा एकदा राजकीय खलबतं पाहायला मिळालीत. कारण मुंबईतील बाळासाहेब स्मारकात महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक परी पडली. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महसूल खात्यात काही महत्त्वाच्या बदल्या या ३१ जुलै पर्यंत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील बदल्यांच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. याआधी बदल्यांवरून झालेलं राजकारण महाराष्ट्राने पाहिलंय.

महत्त्वाची बातमी - नवऱ्याच्या गाडीत पाहिलं 'ती'ला आणि बायकोने केली आख्खी मुंबई जॅम...

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरून मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं होतं. तसं पुन्हा होऊ नये म्हणून बाळासाहेब थोरातांकडून सावध भूमिका घेतल्याचं बोललं जातंय. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी काळात कशा प्रकारे पुढील वाटचाल ठेवावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. 

सोबतच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या काही काळात शरद पवार आणि राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठका झाल्यात. अशात सध्याचं राजस्थानमधील राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसला विश्वास देण्यासाठी आजची  बैठक झाल्याचं समजतंय. 

congress minister balasaheb thorat met CM uddhav thackeray