Congress: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसचं 'मिशन शतक प्लस'

समीर सुर्वे
Sunday, 24 January 2021

मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने मैदान तयार करण्यास सुरवात केली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने "मिशन शतक प्लस' आखले आहे.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने मैदान तयार करण्यास सुरवात केली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने "मिशन शतक प्लस' आखले आहे. त्यासाठी महायुती न करता एकट्याने लढण्याचा निर्णय मुंबई कॉंग्रेसने घेतला आहे.

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यापासून मेळावे, बैठकांचे सत्र सुरु आहे. भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरण सिंह सप्रा यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. ब्लॉक अध्यक्षांपासून विद्यमान आमदार, नगरसेवक आणि विधानसभा तसेच महानगर पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील माहिती जमा केली जात आहे. या माहितीच्या आधारावर झोपडपट्ट्यांना मोफत पाणी पुरवठा, पुनर्विकासाला पोषक धोरण अशा मुंबईतील मुद्द्यांवर निवडणूक लढवल्या जाणार आहेत. असे संकेत पक्षातून मिळत आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे महापौर करण्याचा निर्धारच करण्यात आले आहे. त्यासाठी मिशन शतक प्लस आखण्यात येत आहे. कॉंग्रेसचे 2017च्या निवडणुकीत 32 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र 30 उमेदवार 500 पर्यंतच्या आणि त्याच्या आसपास उमेदवार 500 ते एक हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे या सर्वाची गोळा बेरीज करुन कॉंग्रेसने मिशन शतकची आखणी केली असल्याचे समजते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
एकट्याने लढून जास्त जागा

गेल्या 20 वर्षात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा 2007 मध्ये मिळाल्या होत्या.त्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या 73 जागा निवडून आल्या होत्या. ही निवडणूक कॉंग्रेस एकट्याने लढली होती. मात्र 2017 मध्येही कॉंग्रेस एकट्याने लढून 31 जागा आल्या होत्या. हा कॉंग्रेससाठी सर्वात वाईट काळ होता असे पक्षाचे नेतेच मानत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक एकट्याने लढल्यास पक्षाला नक्कीच फायदा होईल तसेच कार्यकर्त्यांमध्येही विश्‍वास वाढेल असे असा दावा नेते मंडळी करत आहे.

हेही वाचा- शेतकरी मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल, 'वादळ' राजभवनावर धडकणार

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Congress Mission Century Plus bombay Municipal Corporation elections 2022 mumbai news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Mission Century Plus bombay Municipal Corporation elections 2022 mumbai news