आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर

मिलिंद तांबे
बुधवार, 26 जून 2019

मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोडचे आमदार तसेच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली. काँग्रेस मधून बाहेर पडलेले सत्तार विधानसभा निवडणूक शिवसेनेतून लढवण्यास इच्छुक असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव  ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात अर्धातास चर्चा झाली.सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता होती मात्र सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्याने मुख्यमंत्र्यांकडून सत्तार यांचे शिवसेनेत राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे. आपण उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली.विधानसभा निवडणुका तोंडावर असून याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.या चर्चेनंतर जो काही निर्णय होईल तो लवकरच कळवण्यात  येईल असे सत्तार यांनी स्पष्ट केले.शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकरही यावेळी अब्दुल सत्तार यांच्या सोबत उपस्थित होते. 

अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबदमधील सिल्लोड मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषद आमदार सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर, अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांनी थेट काँग्रेसविरोधात बंड पुकारलं.त्यामुळे काँग्रेसने सत्तार यांच्यावर पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी केली.यानंतर युतीमधील नेत्यांच्या संपर्कात असणारे सत्तार आता शिवसेनेतून विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Abdul Sattar possibility to enter in Shivsena