पोटनिवडणुकीतही भाजपची कोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - कर्नाटकातील राजकीय घडामोडी, तसेच भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघात अस्तित्वात आलेला उत्तर प्रदेशातील छुपा पॅटर्न, यामुळे भाजपची अडचण झाल्याचे चित्र आहे. राज्यातील दोन्ही मतदारसंघांत दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केली असल्याने ही पोटनिवडणूक भाजपला जड जाऊ शकते.

पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपच्या माजी खासदाराच्या पुत्राला निवडणुकीत उतरवले आहे. या तुलनेत भाजपचा उमेदवार कमकुवत असताना बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभा केला.

निवडणुकीतील ही सद्य:स्थिती, तसेच गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना पडलेली मते विचारात घेता भाजपसाठी हा मतदारसंघ अवघड असल्याचे दिसून येते. भंडारा-गोंदिया मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत 51 हजार, तर विधानसभेच्या 6 मतदारसंघांत 1 लाखाहून अधिक मते मिळविणाऱ्या "बसप'ने उमेदवार दिला नाही. तसेच शिवसेनेच्या उमेदवाराला शेवटपर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. दोन्ही मतदारसंघांत अस्तित्वात आलेला छुपा यूपी पॅटर्न, तसेच कर्नाटकातील घडामोडी यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

Web Title: congress NCP byelection BJP politics