मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना युतीला 13 जागा

मुरलीधर दळवी
बुधवार, 12 जुलै 2017

मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या सहकार पॅनेलने 15 पैकी 10 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते भाजपच्या परिवर्तन पॅनेलला 5 जागांवर समाधान मानावे लागले.

मुरबाड (जि. ठाणे) - मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या सहकार पॅनेलने 15 पैकी 10 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते भाजपच्या परिवर्तन पॅनेलला 5 जागांवर समाधान मानावे लागले.

मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 15 जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली आज बुधवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब व साहाययक निवडणूक अधिकारी सुरेश अधिकारी यांनी निकाल जाहीर केला या निवडणुकीत 18 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते सहकार पॅनेलने कृषी पतसंस्था मतदार संघात 11 पैकी 10 तर परिवर्तन पॅनेलने ग्राम पंचायत मतदार संघात सर्व 4 जागा व कृषी पतसंस्थेत एक जागा अशा 5 जागा जिंकल्या भाजप तर्फे खासदार कपिल पाटील आमदार किसन कथोरे यांनी निवडणूक प्रचारात सहभागी होऊन वर्षानुवर्षे बाजार समितीवर वर्चस्व गाजविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार गोटीरांम पवार यांना आव्हान दिले होते तर राज्यात सत्तेतील मित्र असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून सहकार पॅनेल द्वारे निवडणूक लढवली व सत्तेत सहभागी झाले. मुरबाड मधील शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष घरत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करून शिवसेनेचे भिवंडीचे दोन आमदार ठाणे जिल्हा प्रमुख यांचेसह कार्यकर्त्यांची मोठी फळी सहकार पॅनेलच्या मदतीला आणली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सहकार पॅनेल मधील विजयी उमेदवार
1) आलम भाऊ गोविंद 2) ईसामे मनोहर शंकर 3) चौधरी विजय मनोहर 4) पवार प्रकाश भाऊ 5) बोसटे चंद्रकांत सीताराम 6) सारनिंगे लक्ष्मण दत्तात्रय 7) कडवं संगीता विठ्ठल 8) पष्टे भारती दशरथ 9) सासे रमाकांत रघुनाथ 10) व्यापारी प्रकाश दत्तात्रय

भाजप परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार
1) बांगर उल्हास दत्तात्रय 2) अश्विनी हरेश खापरे 3) सोमणे सदाशिव महादू 4) कवटे अनिल कांतारांम 5) मोरे अशोक मधुकर

Web Title: congress news ncp news marathi news sakal news