
BJP leaders drape saree to congress worker
ESakal
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी समाज माध्यमावर एक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली मध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वाद सुरु झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांनी पोस्ट व्हायरल केली असता भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना साडी नेसवून सत्कार केला. तर साडी नेसवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.