esakal | काँग्रेसची पालघरमध्ये पीछेहाट !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

काँग्रेसची पालघरमध्ये पीछेहाट !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : पालघर (Palghar) जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत कोणाचा राजकीय दबदबा असेल, याबाबत अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळातून लढवले जात होते. मात्र त्याला पूर्णविराम मिळाला असून जिल्हा परिषदेवर शिवसेनेने (Shivsena) सत्ता कायम राखली आहे.

या पोटनिवडणुकीत दोन जागा अधिक मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. एकीकडे शिवसेनेचे संख्याबळ वाढले असताना, काँग्रेसच्या उमेदवारांना पालघरमध्ये आपले डिपॉझिटही राखता आले नाही. पोटनिवडणुकी पालघर तालुक्यातील ११ लढतीपैकी कोंढाण गणाव्यतिरिक्त सर्व जागांवर काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या चार उमेदवारांचे, तसेच पाच अपक्ष उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसला या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा दावा केला होता; परंतु उमेदवारांना अनामत रक्कमही राखता न आल्याने या | भागात काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झाल्याचे स्पष्ट होत आहे. गड राखला पालघर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या ठिकाणी गड राखण्यात यश आले.

हेही वाचा: पालघर जिल्हा परिषदेत ‘महाविकास’ची सत्ता अबाधित

जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नीता पाटील, विनया कोरे, अरुण ठाकरे, मिताली बागुल, सारिका निकम, राष्ट्रवादीचे लतिका बालजी, भक्ती वलटे, रोहिणी शेलार, अरुण चौधरी, भाजपचे पंकज कोरे, ज्योती पाटील, सुनील माच्छी, संदीप तावडे, सीपीएम अक्षय दवणे, अपक्ष हबीब शेख आदी निवडून आले आहेत.

loading image
go to top