esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Election voting

पालघर जिल्हा परिषदेत ‘महाविकास’ची सत्ता अबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : पालघर जिल्हा परिषदेच्या (palghar ZP election) १५ आणि पंचायत समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल (election result) बुधवारी जाहीर झाले. आज मतमोजणीनंतर शिवसेनेला (shivsena) दोन जागांचा फायदा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दोन जागांचा फटका बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेत असलेली महाविकास आघाडीची सत्ता (mva Government) मात्र अबाधित राहिली असून, शिवसेना पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.

हेही वाचा: अंबरनाथ : पावसात उद्यानाची भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर

निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आपले खाते उघडता आले नसल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्हा परिषदेसाठी पालघर (२), डहाणू (४), तलासरी (१), विक्रमगड (१), मोखाडा (२) आणि वाडा (५) अशा एकूण १५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी शिवसेना ५, राष्ट्रवादी ४, भाजप ४ आणि माकपला एका जागेवर विजय मिळाला. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यातच आता निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश होणार आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीला दोन जागा गमवाव्या लागल्या.

राष्ट्रवादीचे याआधी सहा सदस्य होते. पोटनिडणुकीत त्यांना चार जागा मिळाल्या. पंचायत समितीवर पालघर (९), वाडा, (१) वसई (२) आणि डहाणू (२) अशा १४ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत वसईत ‘बविआ’ला तीन जागा मिळाल्या. शिवसेना ५, भाजप ३, राष्ट्रवादी २ आणि मनसेला एक जागा मिळाली. सध्या जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बविआ आणि माकप अशी युती सत्तेवर आहे. भाजप विरोधी बाकावर आहे.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

वसई-विरारमध्ये ‘बविआ’ला फायदा

वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडीने दोन जागा जिंकल्या. त्याचा सकारात्मक परिणाम आगामी वसई-विरार पालिका निवडणुकीत होणार असल्याचे बोलले जात आहे. पालिकेवर ‘बविआ’ची पकड आहे.

रोहित गावित यांचा पराभव
खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांचा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. रोहित यांनी इतर मागासवर्गीय जागेवरून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. डहाणू तालुक्यातील वणई गटातून ते रिंगणात होते.

loading image
go to top