

BMC
ESakal
मुंबई : महापालिकेच्या आगामी रणधुमाळीत आता मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र लढण्याचे संकेत दिल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबई प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका वरिष्ठ शिष्टमंडळाने आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.