
उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी कंबर कसणाऱ्या उल्हासनगर काँग्रेसने मुंबई येथे आढावा बैठक घेतली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उल्हासनगर शहरातील रेग्युलराइजेशन प्रक्रियेत २०२२ पूर्वीच्या सर्व बांधकामांचा समावेश करण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थिती करण्याचे निवेदन सादर करण्यात आले.