मुंबईत मुसळधार पाऊस, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

पूजा विचारे
Thursday, 16 July 2020

आज पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप असली तरी उपनगरात मात्र मुसळधार पाऊस सुरुय.

मुंबईः आज पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप असली तरी उपनगरात मात्र मुसळधार पाऊस सुरुय.  मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड परिसरात पहाटे पासून जोरदार पाऊस कोसळतो आहे.तर दादर, हिंद माता परिसरात झालेल्या पावसाने पाणी भरलं आहे. गेल्या तीन तासापासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून 15 आणि आणि 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावरासाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर बुधवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसाच गुरूवारीही पाऊस कायम आहे. मुंबईकरांना आजही पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचाः  'तो' आरोपी मोकाटचं, मुंबई पोलिसांकडून बक्षिस जाहीर

गुरुवारी रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात तुरळक ते मध्यम सरी कोसळतील. तर पुन्हा शनिवारी पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. यासंदर्भातील अद्ययावत माहिती हवामान विभागाकडून जारी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलंय.

मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद

गेल्या २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झालीय. अद्यापही पावसाचा जोर कायमच आहे. पुढील सहा तास मुंबईतील विविध भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

अधिक वाचाः राज्य सरकारला परिक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही; उच्च न्यायालयात याचिका दाखल

बुधवार सकाळी ८ वाजून ३० मिनीटांपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत बांद्रा- २०१ मिमी, कुलाबा-१५२ मिमी, सांताक्रुझ-१५९.४ मिमी, महालक्ष्मी-१२९ मिमी, राम मंदिर- १३० मिमी पावासाची नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

imd issue red alert mumbai heavy rain lash


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imd issue red alert mumbai heavy rain lash