नगर पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

नेताजी दि.नलवडे
शनिवार, 21 जुलै 2018

वाशी : येथील नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी नितीन चेडे तर उपनगराध्यक्षपदी नागनाथ नाईकवाडी यांची निवड झाली आहे. शनिवार (ता.21) रोजी येथील नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी नतंर काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची मोठी आतिशबाजी करुन जल्लोष केला.

मागील अडीच वर्षापुर्वी झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रशांत (बाबा ) चेडे यांच्या नेतृत्वात हि निवडणुक लढवुन बारा जागेवर विजय मिळवुण नगर पंचायतीची एकहाती सत्ता मिळवलेली आहे. 
येथील नगराध्यक्षा प्रतिभा शिंगणापुरे व उपनगराध्यक्ष नितिन चेडे यांचा अडिच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार (ता.21) रोजी हि निवडणुक प्रक्रिया पार पडली.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडुन नितिन चेडे व उपनगराध्यक्ष पदासाठी नागनाथ नाईकवाडी तर महाराष्ट्र विकास आघाडी कडुन नगराध्यक्षपदासाठी कल्पना केळे तर उपनगराध्यक्ष पदासाठी उमा क्षिरसागर यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी हातवर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये नितिन चेडे व नागनाथ नाईकवाडी यांना प्रत्येकी बारा मतदान पडले तर कल्पना केळे व उमा क्षिरसागर यांना प्रत्येकी चार मतदान पडले. पिठासन अधिकारी म्हणुन कळंब उपविभागीय अधिकारी डाँ. चारुशीला देशमुख या उपस्थीत होत्या. यावेळी नायब तहसिलदार सुरेंद्र डोके नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थीत होते.

Web Title: Congress win Nagar Panchayat election