काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; बोरिवली स्थानकात रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर होत असललेल्या ईडीच्या चौकशीला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे.
Borivali station_Congress
Borivali station_Congress

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर होत असललेल्या ईडीच्या चौकशीला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून बोरिवली रेल्वे स्थानकात त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. (Congress workers aggressive an attempt was made to stop the train at Borivali station)

काही कार्यकर्ते हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन रेल्वे स्थानकात दाखल झाले, जोरदार घोषणाबाजी करत त थेट रेल्वे रुळावर दाखल झाले. यानंतर त्यांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला पण यात ते यात अयशस्वी ठरले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पीआरओंनी दिली.

Borivali station_Congress
PMLA : पीएमएलए कायद्यातील तरतुदी कायम राहणार; सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब

दरम्यान, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सध्या सोनिया गांधी यांना ईडीकडून तिसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. सोनिया गांधींना वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येऊन त्यांचा छळ केला जात असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्यामुळं त्यांनी आज पुन्हा देशभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com