esakal | मुंबईतल्या कोरोना रुग्णांना दिलासा! महापौरांनी दिली 'ही' माहिती, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतल्या कोरोना रुग्णांना दिलासा! महापौरांनी दिली 'ही' माहिती, वाचा...

ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना आपत्कालीन उपचारांची आवश्यकता आहे अशा सर्व रुग्णांना बेड उपलब्ध करुन दिले जातील, असं महापौरांनी सांगितलं आहे. याच दरम्यान महापौरांनी मुंबईची आरोग्य यंत्रणा कोसळल्याच्या आरोपावरून विरोधकांना फटकारलं देखील आहे. 

मुंबईतल्या कोरोना रुग्णांना दिलासा! महापौरांनी दिली 'ही' माहिती, वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतोय. मुंबईत भयावह परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईतील रुग्णालय खचाखच भरल्यानं खाटांसाठी रुग्णांची वणवण होते. याच संदर्भात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक माहिती दिली आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना आपत्कालीन उपचारांची आवश्यकता आहे अशा सर्व रुग्णांना बेड उपलब्ध करुन दिले जातील, असं महापौरांनी सांगितलं आहे. याच दरम्यान महापौरांनी मुंबईची आरोग्य यंत्रणा कोसळल्याच्या आरोपावरून विरोधकांना फटकारलं देखील आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा...

हो, आम्हाला खाटांच्या उपलब्धतेबाबत काही समस्या आहेत मात्र विरोधी पक्ष ज्यापद्धतीनं दावा करत आहेत त्यासारखी परिस्थिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही खाजगी रुग्णालय देखील बेडच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. परिस्थिती अशी आहे की, एखाद्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येताच प्रत्येकाला असं वाटत की त्यांना बेडची आवश्यकता आहे. मात्र हे अशा प्रकारे कार्य करत नाही. ज्यांची प्रकृती गंभीर आणि आपत्कालीन परिस्थिती आहे त्यांनीच बेड घ्यावा, असं महापौर किशोर पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

मुंबई महापालिकेचा 'तो' डॅशबोर्ड 'Not Working'!

कोरोना व्हायरसमुळे रुग्णालयात आधीपासूनच तणाव आहे आणि तो तणाव आता आणखी वाढला आहे, त्यामुळे हे परिस्थिती आपल्याला समजून घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही इतर आजार असलेल्या इतर रुग्णांचीही काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे पेडणेकर म्हणाल्या की, प्रशासनाने कोविड -19 च्या रूग्णांसाठी विविध आयसोलेशन सेंटर, सीसी 1 आणि सीसी 2 सुविधा उपलब्ध केल्यात. तसंच या यादीत आणखी भर टाकण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 

खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा नवा उपाय; 'हे' अधिकारी ठेवणार लक्ष... 

शनिवारी मुंबईतील कोविड 19 रुग्णांचा आकडा प्रकरणांची नोंद 47,128 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 1,274 नवीन प्रकरणे आढळून आली. मुंबई महापालिकेनं यासंदर्भातली माहिती दिली. 57 नवीन मृत्यूंसह शहरातील एकूण मृत्यूचा आकडा 1,575 वर गेला आहे.

loading image
go to top