मच्छीमारांना नियमित दरात डिझेल देणार; केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 fishermen

मच्छीमारांना नियमित दरात डिझेल देणार; केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन

पालघर : नॅशनल फिशवर्कर्स फोरम, गुजरात फिशरमन बोट असोसिएशन व महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मत्यव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन कन्झ्युमर ग्राहक व किरकोळ डिझेल विक्रेता यांच्या मध्ये रूपये २५ ते ३० रूपये मच्छिमारांना अन्यायकारक जास्त दर आकारले आहे. ही बाब मंत्र्यांच्या निर्दशनात आणून दिले.

पुरूषोत्तम जी रूपाला यांनी सांगितले की, आपले म्हणणे रास्त आहे. याबाबत मला ही आज माहीती आपल्याकडून मिळाली. आपण निश्चित रहा. संबंधित केंद्रीय पेट्रोलियम मंत्री व केंद्रीय अर्थ मंत्री यांच्या सोबत चर्चा करून त्वरित देशातील मच्छिमारांना नियमित दरात डिझेल देणार, ती माझी खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी आहे. तुम्हाला बोटी बंद ठेवण्याचा व संप, आंदोलन करण्याची गरज भासणार नाही तसेच भारतातील मच्छिमारांना होळी च्या शुभेच्छा दिल्या.

सदर शिष्टमंडळात जागतिक मच्छिमार सांघटने सदस्य व महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती चे अध्यक्ष लिओ कोलासो, गुजरात मत्सोदयोग महामंडळ अध्यक्ष वेलजीभाई मसानी, नॅशनल फिशवर्कर्स फोरम चे उपाध्यक्ष व महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, अध्यक्ष *तुलशीभाई गोयल, महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजेन मेहेर, मुकेश पंज्यारी कन्यालाल सोलंकी, नरशीभाई व मोहनभाई भरत इत्यादी उपस्थित होते.

तसेच याबाबत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व . केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी* यांना लेखी निवेदन सादर करण्यात आली. अशी माहिती मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले